सिंधूताई सपकाळ हे नाव आपण कधीना कधी ऐकलेच असेल.समाजाला काहीतरी चांगल देण्याची,त्यांना वळण लावण्याची ताकद असणारे अनेक प्रतिभावंत मराठी मातीत आहेत.प्रश्न आहे तो फक्त त्यांच्या कार्याची दखल घेण्याचा.आपल्या कार्याचा ठसा जनमाणसावर उमटवणाऱ्या व्यक्तीमध्ये सिंधुताई सपकाळ यांचे नाव अग्रक्रमंकाने आणि आदराने घेतले जाते.समाजाने धूडकारलेल्या, स्वकीयांच्या प्रेमाला पारख्या झालेल्या असंख्य निराधारांना आपल्या मायेच्या स्पर्शाने,प्रेमाने आपलास करणाऱ्या सिंधुताई सपकाळ या मातेची कहाणी कोणालाही थक्क करणारी आहे.वैयक्तिक आयुष्यातील दुखाचे डोंगर दूर सारत दुसर्यांसाठी आयुष्य वेचणाऱ्या सिंधूताईचा जीवनपट खरच प्रेरणादाई आहे.
अनाथ मुलाच्या प्रेमात कसर राहू नये म्हणून पोटच्या मुलीला दुसर्या अनाथआश्रमात ठेवणाऱ्या सिंधूताई सपकाळ यांचा जीवनपट आता चित्रपट रुपात येत आहे.सचिन आणि बिंदिया खानविलकर यांनी 'मी सिंधूताई सपकाळ' या चित्रपटाच्या निर्मितीला सुरवात केली आहे. या चित्रपटात ताईच्या जीवनातील सर्व घटनांचा,चढ- उताराचा समावेश करण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे. जसे लग्नामुळे मधेच सोडावे लागलेले शिक्षण,थंडीपासून रक्षण करण्यासाठी घेतलेल्या चितेच्या आगीचा शेक आणि पोटाची भूक भागविण्यासाठी अंत्यसंस्काराच्या वेळी आणण्यात येणाऱ्या पिंडाचा भात खाण्यापासून ते अमेरिकेतील आंतरराष्ट्रीय व्यासपीठावरून आपले विचार मांडणाऱ्या सिंधूताईची रोमांचित करणारी जीवनयात्रा.या चित्रपटाची कथा सिंधूताईच्या 'मी वनवासी' या पुस्तकावर आधारलेली आहे.
हा चित्रपट एक जागतिक दर्जाचा ह्वावा अशी अपेक्षा करण्यास हरकत नाही.या चित्रपटाद्वारे सिंधूताई जनमाणसापर्यंत पोहचतील अशी आशा करूयात.
सिंधूताईना प्रत्यक्ष भेटण्याचा योग फार कमी आला.लहान असताना आमच्या गावात सिंधूताईचा कार्यक्रम होता त्यावेळी त्यांना ऐकण्याचा योग आला होता.बोलताना त्या लोकांना आपलेसे कधी करून घेतात हेच लक्षात येत नाही.आपली अनाथ मुलांसाठीची तग मग मांडताना त्या आजही कवितांचा आधार घेतात.गदिमा,बहीणाबाई,सुरेश भटांच्या कविता त्यांच्या तोंडून ऐकताना ऐकणारा तल्लीन झाला नाहीतर नवलच!
सगळ बोलून झाल कि माई लोकांसमोर आपली झोळी फैलावतात आणि अनाथांसाठी काहीतरी मदत करा अशी साद घालतात.'१७० हून अधिक पुरस्कार मिळाले,पण ते पुरस्कार खाऊन पोट भरत नाही' म्हणून त्यांना लोकांसमोर हात पसरावे लागतात.आश्रमातील सात-आठशे मुलांच्या खर्चाची तजवीज करताना त्यांची दमछाक होते.'गाना नाही तो खाना नही,भाषण नही तो राशन नही' असे म्हणत आपल्या मुलांना २ वेळच जेवण मिळव म्हणून त्या आजही महाराष्ट्रभर हिंडत असतात.त्यांची हि परवड कधी संपणार परमेश्वरालाच माहिती.
आम्ही फेसबुक वरील एका समूहातील काही सभासदांनी मिळून काहीतरी सामाजिक कार्य करण्याच्या उद्देशाने एक मोहीम राबविली होती. तसेच आपण सर्व मराठी ब्लॉगर मिळून सिंधुताई साठी काही करू शकतो का ? जास्त नाही एकाने ५००-१००० जरी जमा केले तरी चालतील तेही नाही जमले तरी १००-२०० तरी देऊ शकतोच कि. बघा पटतंय का ते प्रतिसाद द्या प्रत्यक्षात आणू आपण हे, मी वाट पाहत आहे.
कोणाला जरी सरळ आश्रमात जाऊन मदद करायची असेल तरी ते तसे करू शकतात.पुण्यापासून जवळ आहे.
आश्रमाचा पत्ता:
सन्मती बाल निकेतन
बेल्हेकर वस्ती, मंगल एंटरप्रायजेस शेजारी,
वसंतदादा साखर कारखान्याजवळ, मांजरी बु.,
पुने - ४१२ ३०७
सिंधुताईचा पत्ता -
सन्मती बाल निकेतन संस्था,
मिनाक्षी बिल्डींग, दुसरा मजला, विहार चौक,
तुपे आळी, हडपसर,
पुणे - २८
फोन नं - ०२० - २६८७०४०३
अनाथ मुलाच्या प्रेमात कसर राहू नये म्हणून पोटच्या मुलीला दुसर्या अनाथआश्रमात ठेवणाऱ्या सिंधूताई सपकाळ यांचा जीवनपट आता चित्रपट रुपात येत आहे.सचिन आणि बिंदिया खानविलकर यांनी 'मी सिंधूताई सपकाळ' या चित्रपटाच्या निर्मितीला सुरवात केली आहे. या चित्रपटात ताईच्या जीवनातील सर्व घटनांचा,चढ- उताराचा समावेश करण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे. जसे लग्नामुळे मधेच सोडावे लागलेले शिक्षण,थंडीपासून रक्षण करण्यासाठी घेतलेल्या चितेच्या आगीचा शेक आणि पोटाची भूक भागविण्यासाठी अंत्यसंस्काराच्या वेळी आणण्यात येणाऱ्या पिंडाचा भात खाण्यापासून ते अमेरिकेतील आंतरराष्ट्रीय व्यासपीठावरून आपले विचार मांडणाऱ्या सिंधूताईची रोमांचित करणारी जीवनयात्रा.या चित्रपटाची कथा सिंधूताईच्या 'मी वनवासी' या पुस्तकावर आधारलेली आहे.
हा चित्रपट एक जागतिक दर्जाचा ह्वावा अशी अपेक्षा करण्यास हरकत नाही.या चित्रपटाद्वारे सिंधूताई जनमाणसापर्यंत पोहचतील अशी आशा करूयात.

सगळ बोलून झाल कि माई लोकांसमोर आपली झोळी फैलावतात आणि अनाथांसाठी काहीतरी मदत करा अशी साद घालतात.'१७० हून अधिक पुरस्कार मिळाले,पण ते पुरस्कार खाऊन पोट भरत नाही' म्हणून त्यांना लोकांसमोर हात पसरावे लागतात.आश्रमातील सात-आठशे मुलांच्या खर्चाची तजवीज करताना त्यांची दमछाक होते.'गाना नाही तो खाना नही,भाषण नही तो राशन नही' असे म्हणत आपल्या मुलांना २ वेळच जेवण मिळव म्हणून त्या आजही महाराष्ट्रभर हिंडत असतात.त्यांची हि परवड कधी संपणार परमेश्वरालाच माहिती.
आम्ही फेसबुक वरील एका समूहातील काही सभासदांनी मिळून काहीतरी सामाजिक कार्य करण्याच्या उद्देशाने एक मोहीम राबविली होती. तसेच आपण सर्व मराठी ब्लॉगर मिळून सिंधुताई साठी काही करू शकतो का ? जास्त नाही एकाने ५००-१००० जरी जमा केले तरी चालतील तेही नाही जमले तरी १००-२०० तरी देऊ शकतोच कि. बघा पटतंय का ते प्रतिसाद द्या प्रत्यक्षात आणू आपण हे, मी वाट पाहत आहे.
कोणाला जरी सरळ आश्रमात जाऊन मदद करायची असेल तरी ते तसे करू शकतात.पुण्यापासून जवळ आहे.
आश्रमाचा पत्ता:
सन्मती बाल निकेतन
बेल्हेकर वस्ती, मंगल एंटरप्रायजेस शेजारी,
वसंतदादा साखर कारखान्याजवळ, मांजरी बु.,
पुने - ४१२ ३०७
सिंधुताईचा पत्ता -
सन्मती बाल निकेतन संस्था,
मिनाक्षी बिल्डींग, दुसरा मजला, विहार चौक,
तुपे आळी, हडपसर,
पुणे - २८
फोन नं - ०२० - २६८७०४०३
👌👌👌👌👌खरेच खुप छान संकल्पना आहे तुमची आम्ही नक्कीच मदत करू.......👍👍👍👍👍
ReplyDeleteNice
ReplyDeleteNice concept 👌
ReplyDeleteकेवळ आर्थिक स्वरुपात मदत करण्यापेक्षा शिक्षक म्हणून काही अनाथ मुलांना अध्यापन करू शकाल तर अधिक चांगले होईल.
ReplyDelete